Surprise Me!

अबब! तरुणाच्या पोटातून काढले २६३ नाणी आणि १२ ब्लेड | पहा व्हिडिओ | लोकमत न्यूज़

2021-09-13 0 Dailymotion

या विश्वात कधी आणि काय होईल याचा कुणीच अंदाज लावू शकत नाही. आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हाला धक्काचबसेल.मध्यप्रदेशा तील संजय गांधी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी एका युवकाच्या पोटातून नाणी, खिळे आणि चेन काढले आहेत.शुक्रवारी डॉक्टरांच्या एका टीमने ३२ वर्षीय तरुणाच्या पोटातून २६३ नाणी, १० ते १२ शेव्हिंग ब्लेड, काचेचे तुकडे, लोखंडी साखळीशिवायही अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत.या तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुलाला धातूच्या वस्तू खाण्याची सवय लागली होती. त्यामुळे तो धातूसदृश्य वस्तू खात असे.लहानपणापासूनच तो लपून-छपून नाणी आणि इतर लोखंडी वस्तू खात असे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्याची तपासणी सुरु करण्यात आली आणि शुक्रवारी ऑपरेशन करण्यात आलं. सतनामध्ये सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी त्याला टीबी झाल्याचं म्हणत उपचार सुरु होता. मात्र, परिस्थितीत सुधार होत नसल्याने रिवा मेडिकल कॉलेजमध्ये त्याला आणण्यात आलं. यानंतर तपासणीत हा प्रकार समोर आल्याची माहिती रुग्णाच्या नातवाईकांनी दिली आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon